Protect your child from Measles – Aapla Dawakhana Campaign

Measles is a disease caused by a virus that enters the body through the cough of patients through the air and through the respiratory system of the person in contact. At present, patients of this disease are being found in Mumbai and surrounding areas. In this background, it has become necessary for parents to take care of their children, so if symptoms of this disease occur in children, they should not panic and contact the nearest Vandaniya Balasaheb Thakrey Aapla Dawakhana Clinic and Primary Health Centers at Thane Municipal Corporation.

Vandaniya Balasaheb Thackeray Aapla Dawakhana by MedOnGo Health Pvt. Ltd.


गोवर पासून आपल्या पाल्याला जपा

गोवर विषाणू पासून होणारा आजार असून रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत आणि संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. सध्या मुंबई सह आसपासच्या परिसरात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणे आवश्यक झाले आहे म्हणून बालकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व ठाणे महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

गोवरची लक्षणे:
• सुरुवातीला ताप,सर्दी,खोकला येणे.
• डोळे लाल होणे.
• दोन चार दिवसानंतर अंगावर लाल पुरळ येणे.
• कानामागे, चेहरा, छाती, पोटावर पुरळ पसरणे

गोवर टाळण्यासाठी काय करावे?

• बालकांचे गोवर, रुबेला हे लसीकरण गरजेचे
• वेळापत्रकानुसार लसीकरण आवश्यक
• सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध
• डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

लसीचा डोस
• पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने वयोगट दुसरा डोस १६ ते २४ महिने वयोगट

अशी घ्या काळजी

• बालकाचे गोवरचे दोन डोस झाले आहे की नाही हे तपासावे
• घरात कोणाला गोवर झालेला असल्यास बालकांची विशेष काळजी घ्यावी
• एक डोस झालेला असल्यास गोवरची तीव्रता कमी

Aapla Dawakhana Social Media